पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निघोजमधील महिलेला पेटवून मारल्याच्या प्रकरणाला पुन्हा नवे वळण!

निघोजमध्ये महिलेला जाळून मारल्याचे प्रकरण

अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावात गरोदर महिलेला पेटवून तिला मारून टाकल्याच्या प्रकरणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित महिलेचा पती मंगेश रणसिंग यांच्या दोन भावांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडेही या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपाधीक्षक मनीष कालवानिया यांनी ही माहिती दिली. 

निघोजमधील महिलेला जाळून मारल्याचे प्रकरण

एक मे रोजी रुक्मिणी नावाच्या या महिलेला पेटवून देण्यात आले होते. यामध्ये तिचा मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर नगर पोलिसांनी त्याचा तपास करण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार केले. सुरुवातीला संबंधित महिलेचे वडील रामा भारतीय आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुक्मिणीला जाळल्याची माहिती पुढे आली होती. परजातीतील पुरुषाशी लग्न केल्यामुळे वडिलांनी हे कृत्य केल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचे पाहून पोलिसांनी संबंधित महिलेच्या वडिलांना आणि त्यांच्या भावाला अटक केली. पण नंतर या प्रकरणात वेगळीच माहिती पुढे आली होती. संबंधित महिलेच्या नवऱ्यानेच तिला जाळून मारल्याची तपासात दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी नवऱ्याकडे चौकशी सुरू केली. या प्रकरणात महिलेचा नवरा ५० टक्के भाजला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला अद्याप रुक्मिणीचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आलेले नाही. तो उपचार घेत असून, दोन पोलिस कर्मचारी त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत.

ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळे वळण; पतीनेच पत्नीला पेटवले?

मनीष कालवानिया म्हणाले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी मंगेश रणसिंग याचे भाऊ महेश आणि विक्रांत यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, मंगेशची बहीण प्रिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांच्या सगळ्याचे मोबाईल जप्त केले आहेत. महेश आणि विक्रांत या दोघांना ससून रुग्णालयातूनच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे तिने सांगितले.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले रुक्मिणीचे वडील रामा भारतीय आणि त्यांच्या भावाला सोडून द्यावे, अशी विनंती पोलिसांनी नगरमधील न्यायालयात केली आहे. 

ही घटना घडल्याच्या आदल्याच दिवशी मी रुक्मिणीच्या घरी गेले होते. मला तिच्याशी बोलायचे होते. पण तिच्या घरच्यांनी मला तिला भेटू दिले नाही. त्यांनी मला शिवीगाळ केला आणि तिथून हाकलून दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा भाऊ मंगेश तिथे गेला, असे प्रियाने सांगितले.

मनीष कालवानिया यांना सांगितले की आम्ही ४-५ साक्षीदारांची साक्ष नोंदविली आहे. हा ऑनर किलिंगचा प्रकार नाही. या प्रकरणात काही परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुरावे आम्हाला मिळाले आहेत.