पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा!

नदीकाठचे अतिक्रमण हटवण्याचे आदेश

पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातून वाहणाऱ्या नदीच्या पात्रातील अतिक्रमण हटवण्यासंदर्भातील आराखडा तयार करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. पुणे महानगर पालिकेसह अन्य सरकारी संस्थाना यासंदर्भातील कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून योग्य ती कारवाई न झाल्यास पालिकेला दंड आकरण्यात येणार आहे. 

जम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद

नदीपात्रातील अतिक्रमण हटवले नाही तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी- पीएमआरडीए) प्रत्येकी १ कोटी दंड आकरला जाईल, असेही राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले आहे. हरित लवादाने १ ऑक्टोबरला यासंदर्भात आदेश काढले असून मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी काठी झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचा अवधी स्थानिक संस्थांना देण्यात आला आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापूर्वी यासंदर्भात कोणती कारवाई करणार याचा आराखडा स्थानिक संस्थांना सादर करायचा आहे.

निकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी

 पुणे महानगर पालिकेचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भातील आराखडा तयार करुन हरित लवादाकडे सूपूर्द करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचव महानगर पालिकेकडून देखील आदेशानुसार, आराखडा सादर केल्याची माहिती पालिकेतील अधिकारी मंगेश दिघे यांनी दिली आहे.