पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुढील तीन दिवस पावसाचेच

पुण्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. थंडी पडण्याचे दिवस असतानाही राज्यात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस सुरु आहे. गेल्या अनेक वर्ष ज्या भागात समाधानकारक पाऊसही नव्हता, तिथे यंदा अखेरच्या क्षणी पाऊस पडत आहे. राज्यात आणखी तीन दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी (दि.२३) पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

खासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...

अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात २७ ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Infosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले