पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सविता भाभी, तू इथंच थांब', पुण्यात पुन्हा पोस्टरबाजी

पुन्हा पुण्यातील पोस्टरबाजीची चर्चा

घरासमोर लावलेल्या खास संदेश देणाऱ्या पाट्यांनी ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात सध्या अनोख्या पोस्टरबाजीची चर्चा होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड परिसरात झळकलेल्या 'शिवडे, आय एम सॉरी' या पोस्टरबाजीनंतर आता आणखी एक बेकायदेशीर पोस्टर पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. 'सविता भाभी' अशा नावाचा उल्लेख करुन शहरातील ठिकठिकाणी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. 

'देश के गद्दारों को...' यासारख्या विधानांनी घात केला- अमित शहा

पुण्यातील काही रस्त्यांवर लागलेल्या पोस्टरवर ' सविता भाभी, तू इथंच थांब….' असा मजकूर लिहिण्यात आला असून हे पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. पुण्यातील म्हात्रे पुलासह अन्य काही भागामध्ये ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. काळ्या रंगाची पार्श्वभूमी असलेले हे पोस्टर नेमकं कोणत्या हेतूने आणि कोणी लावले आहे, यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. महापालिका प्रशासनाकडून यावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

नेहरु-पटेल कॅबिनेटवरुन परराष्ट्र मंत्री जयशंकर-रामचंद्र गुहा आमनेसामने

मागील काही दिवसांपासून पुणे शहर पोस्टरबाजीमुळे चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते आशिष यांनी आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्यानंतर देखील पुण्यात पोस्टरबाजीच्या माध्यमातून निषेध नोंदवण्यात आला होता. यावेळी वादग्रस्त मजकूरासह पोस्टरबाजी झाल्याचे पाहायला मिळाले होते.