पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींच्या या कामाचे कौतुक

शरद पवार आणि नरेंद्र मोदी

पुण्यातील आळंदी येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. मोदींनी ज्याप्रमाणे काशी घाट स्वच्छ केला तसेच आपल्यालाही इंद्रायणी स्वच्छ करायची आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. तीर्थक्षेत्र काशीला गेल्याची आठवण सांगताना शरद पवार म्हणाले की, मी एकदा काशीला गेलो होतो. त्यावेळी घाटावरील परिस्थिती खूप बिकट होती. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काशी घाटावर अर्धवट जळलेली मृतदेह पाहायला मिळायचे. मात्र आता ते चित्र बदलले आहे.

कुठलाही हेतू मनात ठेवून इथं आलो नाही : शरद पवार

या लोकसभा क्षेत्रातून निवडून आल्यानंतर मोदींना त्याठिकाणी कायापालट केला. मोदींसोबत मतभेद असतील पण त्यांचे हे काम कौतुकास्पदच आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पुण्यातील आळंदी येथील जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्यातील कार्यक्रमात शरद पवारांनी इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची मोहिमेसंदर्भातील संकल्पना आवडल्याचे सांगितले. यासंदर्भात काम मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांशी चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावू असे शरद पवारांनी म्हटले आहे. 

हर्षवर्धन जाधव यांची घरवापसी; राज ठाकरेंच्या उपस्थितीत 'मनसे'प्रवेश

मोदी-पवार यांच्यात राजकीय मतभेद असले तरी हे दोन्ही काही गोष्टीबद्दल एकमेकांच्या कामाचे कौतुक करताना अनेकदा पाहायला मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी शरद पवारांचे अनेकदा कौतुक केलेआहे. एवढेच नाही तर राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोदींनी पवारांवर टीकास्त्र सोडल्याचेही पाहायला मिळाले होते.