पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भाजप-शिवसेनेचे राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा'

धनंजय मुंडे

शेतकऱ्यांच्या पीक विमाप्रश्नी शिवसेनेने बुधवारी मुंबईत काढलेल्या मोर्चावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली. शिवसेना आणि भाजपचे राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे. एकीकडे मंत्रिमंडळात वाटा मागतात आणि दुसरीकडे यंत्रणेविरोधात आंदोलन करतात, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी शिवसेनेच्या मोर्चावर टीका केली.

१५ दिवसांत प्रकरणं मार्गी लावा नाहीतर..ठाकरेंचा विमा कंपन्यांना इशारा

धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, पीकविम्या संदर्भात सत्ताधारी शिवसेनाच 'इशारा मोर्चा' काढते आहे. भाजप, शिवसेनेचे राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा. एकीकडे मंत्रिमंडळात वाटा मागतात, मांडीला मांडी लावून बसतात मग त्यांच्या यंत्रणेविरोधातच आंदोलन करतात. अरे काय लावलंय यांनी!.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी सकाळी मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात भारती अक्सा या खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांत प्रलंबित प्रकरणे निकाली काढा. नाहीतर सोळाव्या दिवशी मोर्चा बोलायला लागेल, असा इशारा दिला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही सादर केले.