पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व कायद्यावरून धार्मिक, सामाजिक सलोखा संपविण्याचे काम - शरद पवार

शरद पवार

सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला (एनआरसी) केवळ देशातील अल्पसंख्य समाजाचा विरोध नाही तर विचार करणाऱ्या सगळ्यांचा विरोध आहे, याचा केंद्र सरकारने विचार केला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली. या कायद्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यात दुरावा निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असाही आरोप त्यांनी केला. 

आर्थिक मंदीवरुन लक्ष हटवणाऱ्या अमित शहांचं अभिनंदनः राज ठाकरे

सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. देशाच्या अनेक भागात या कायद्याविरोधात निदर्शने आणि मोर्चे काढण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत यावर टीका केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला आपल्या पक्षाने संसदेत विरोध केला होता, असेही त्यांनी सांगितले.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक सलोखा संपविण्याचे काम केले जात असल्याचे सांगून ते म्हणाले, श्रीलंकेतून अनेक नागरिक भारतात आले आहेत. शेजारी नेपाळमधून आलेले अनेक लोक गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात राहत आहेत. मग त्यांना नागरिकत्व देण्याचा विचार सरकारने का केलेला नाही. काही ठराविक समूहालाच नागरिकत्व देण्याचा विचार का करण्यात आला आहे, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.

३१ डिसेंबरपूर्वी ही चार कामे नक्की संपवा, मगच नव्या वर्षाचे स्वागत करा...

दरम्यान, या कायद्याला विरोध करणाऱ्यांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.