पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजीनामा देण्यापूर्वी अजित पवारांची मुलाशी चर्चा पण माझ्याशी नाही - शरद पवार

शरद पवार

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी किंवा दिल्यानंतर माझ्याशी चर्चा केली नाही. पण राज्य सहकारी बँकेप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळल्यापासून अजित पवार अस्वस्थ होते. यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा पार्थ याच्याशी बोलताना राजकारणाचा दर्जा खालावत चालला आहे. आपण राजकारणातून बाहेर पडू. वेगळे काहीतरी करू, असे त्याला सांगितले. कुटुंबप्रमूख म्हणून मला ही माहिती मिळाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रात्री पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

अजित पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत विधान भवनात जाऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नक्की काय घडले आहे याची माहिती दिली. शरद पवार म्हणाले, काल संध्याकाळी अजित पवार यांचा मला फोन आला होता. त्यावेळी त्यांनी बारामतीमधील पूरस्थिती निवारण्यासाठी काय उपाययोजना केल्या याची माहिती मला दिली. त्याचबरोबर ते आज (शुक्रवारी) बैठकीसाठी मुंबईला येणार होते. फक्त त्यांनी आपल्याला यायला उशीर होईल, एवढेच मला सांगितले होते. पण आज दिवसभर माझा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. कुटुंबप्रमुख म्हणून मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण अजून माझा संपर्क झालेला नाही.

पवार कुटुंबात सर्व निर्णय कुटुंबप्रमुख घेत असतो आणि सर्व सदस्य ते निर्णय ऐकतात. माझे मोठे बंधू होते त्यावेळी आम्ही त्यांचे निर्णय ऐकायचो. आता मी घेतलेला निर्णय सर्वजण ऐकतात. आमच्या कुटुंबामध्ये कोणतेही वाद नाहीत, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.   

राज्य सहकारी बँकेप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अजित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात शरद पवार म्हणाले, अजित पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचे मला कळले. यावेळी अजित पवार यांनी पार्थला सांगितले की राजकारणाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे आपण राजकारण सोडून शेती किंवा उद्योग करू, असे अजित पवार यांनी त्याला सांगितले, असे शरद पवार म्हणाले.

केंद्र सरकारचा पुन्हा दणका, इन्कम टॅक्समधील १५ अधिकारी निलंबित

अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचे मला आज संध्याकाळीच कळले. त्यांनी मला काहीही सांगितले नव्हते. त्यांनी याबद्दल आमच्याशी चर्चा केली नव्हती, असेही शरद पवार यांनी सांगितले.