पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दाभोलकर हत्या प्रकरण: पुनाळेकर आणि भावेंविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल

नरेंद्र दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांविरोधात सीबीआयकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयने पुण्याच्या सत्र न्यायालयात गुरुवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. विक्रम भावे विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयला ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ २१ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने  सीबीआयने एकदिवस आधीच आरोपपत्र दाखल केले.  

भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही: सुभाष देशमुख

दरम्यान, याप्रकरणी विक्रम भावे सध्या तुरुंगात आहे तर संजीव पुनाळेकर हे जामीनावर बाहेर आहेत. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुनाळेकर या हत्या प्रकरणातील कटामध्ये सहभागी असल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. पुनाळेकर यांनी याप्ररणाताली आरोपी शरद कळसकरला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे आरोपपत्रात म्हटले आहे. 

कोल्हापूरात ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; ऊसाचा ट्रॅक्टर

तसंच, नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्या शरद कळसकर याने संजीव पुनाळेकर यांनी दिलेला सल्ला स्विकार केला होता. हत्येनंतर त्याने ठाण्यातील एका खाडीमध्ये चार पिस्तूल फेकल्याचा दावा सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. तसंच, विक्रम भावे याने घटनास्थळी रेखी करण्यासाठी मदत केल्याचा दावा देखील सीबीआयने केला आहे. 

सत्ता संघर्ष मिटणार, पण आघाडी-सेनेचा फॉर्म्युला गुलदस्त्यातच

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:narendra dabholkar murder case charge sheet filed against adv sanjeev punalekar and vikram bhave