पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दाभोलकर हत्या प्रकरण: सीबीआय समुद्रात शस्त्रास्त्र शोधणार

नरेंद्र दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये वापरण्यात आलेली शस्त्रास्त्रे शोधण्यासाठी सीबीआय लवकरच समुद्रामध्ये शोध मोहीम सुरु करणार आहे. शुक्रवारी पुणे न्यायालयामध्ये दाभोलकर हत्या प्रकरणावर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सीबीआयने न्यायालयामध्ये सांगितले की, 'दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रे समुद्रामध्ये शोधण्यासाठी आम्हाला परवानगी मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करा - नाना पटोले

दरम्यान, सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, 'सध्या समुद्रामध्ये भरती येण्याचा इशारा देण्यात आला आहे. जशी परिस्थिती सामान्य होईल तसंच आम्ही शोध मोहिमेला सुरुवात करणार आहोत.' दाभोलकरांची हत्या करुन आरोपींनी शस्त्रास्त्रे समुद्रामध्ये फेकली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने सनातन संस्थेचा सदस्य विरेंद्र तावडे, शूटर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपी सध्या सीबीआयच्या कोठडीमध्ये आहेत. 

राज्यातील पूरस्थितीमुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

दरम्यान, अंधश्रध्दा निर्मुलन समतिचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नरेंद्र दाभोलकर हे मॉर्निक वॉकसाठी जात असताना त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि सीआयडी करत आहेत. 

आमदार बच्चू कडू यांचा दिल्लीत मोर्चा; महाराष्ट्र सदन घेतले ताब्यात