पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दाभोलकर हत्या प्रकरणः पुनाळेकर, भावेला १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना मुंबईहून पुणे येथे आणले (ANI)

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुण्यातील सत्र न्यायालयाने १ जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयने शनिवारी पुनाळेकर आणि भावे यांना मुंबईतून अटक केली होती. पुनाळेकर व भावे यांना आज (रविवारी) सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले होते.

तत्पूर्वी, पुनाळेकर आणि भावे यांना मुंबईहून पुण्याला आणण्यात आले. पुण्यातील सत्र न्यायलयासमोर त्यांना उभे करण्यात आले. 

दाभोलकर हत्येप्रकरणी 'सनातन'चे पुनाळेकर यांच्यासह दोघांना अटक

दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि हिंदू जनजागृती समितीचा सदस्य वीरेंद्र तावडे यांना आधीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत जी माहिती समोर आली त्याआधारे पुनाळेकर आणि भावे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Narendra Dabholkar murder case Adv Sanjeev Punalekar and Vikram Bhave have been sent to CBI custody till June 1