खंडाळा घाटात दरड कोसळल्याने आणि दुरुस्तीच्या कामामुळे बंद असलेली मुंबई-पुणे रेल्वे सेवा येत्या रविवारी, १९ ऑगस्टपासून पूर्ण स्वरुपात सुरू होणार आहे. मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली आहे. या आधी १६ ऑगस्टपासून रेल्वे सेवा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण पुणे ते मुंबई मार्गावर घाटात दुरुस्तीची कामे अद्याप सुरू असल्याने आता रविवारपासून सेवा पूर्ण स्वरुपात पूर्ववत होईल. मध्य रेल्वेकडून मुंबई ते पुणे मार्गावरील काही गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंटरसिटी आणि इंद्रायणी एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.
Following Mumbai-Pune trains restored to run on 16.8.2019 in proper route.
— Central Railway (@Central_Railway) August 15, 2019
11010 Pune-Mumbai Sinhagad Exp
11009 Mumbai-Pune Sinhagad Exp
12123 Mumbai-Pune Deccan Queen
12128 Pune-Mumbai Intercity Exp
22106 Pune-Mumbai Indrayani Exp@drmmumbaicr @drmpune
सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!
गेल्या २५ जुलैपासून मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. खंडाळा घाटात दरड कोसळल्याने आणि रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात दगडांचा ढिगारा पडल्याने रेल्वे सेवा सुरुवातीला खंडीत झाली होती. त्यानंतर पावसामुळे या मार्गावरील कामात सातत्याने अडथळा येत होता. मध्य रेल्वेने आधीच काही रेल्वे १५ दिवसांसाठी रद्द केल्या होत्या. मात्र, त्यानंतर या मार्गावरील सर्वच लांब पल्ल्याची वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईकडून सोलापूरमार्गे कर्नाटक, गोव्याकडे जाणारी वाहतूकही यामुळे विस्कळीत झाली होती.
राज्याला दुष्काळमुक्त करणार; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांचा निर्धार
हजारो प्रवासी रोज पुणे-मुंबई असा प्रवास रेल्वेने करतात. रेल्वेसेवा ठप्प झाल्यामुळे त्यांचे मोठे हाल झाले. गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त काळ या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत आहे.