पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३१ डिसेंबरपर्यंत पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या या गाड्या रद्द

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

लोणावळा ते कर्जत दरम्यान असलेल्या बोरघाटात मंकीहील ते नागनाथ केबीन दरम्यान रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामकाजामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत होणार आहे. रेल्वेने या मार्गावरील पाच गाड्या ३१ डिसेंबर पर्यंत रद्द केल्या आहेत. तर काही रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. 

कात्रजजवळ भीषण अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा मृत्यू

यंदाच्या मान्सूमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे घाट परिसरातील मंकीहील ते नागनाथ केबीन दरम्यान असलेल्या पुलाचा भाग खचला आहे. सध्याच्या घडीला लोणावळा कर्जत दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प असून लवकरात लवकर हा मार्ग पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे.

पुण्यात शिवशाही बस ५० फूट दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू

पूल दुरुस्तीच्या कामामुळे मुंबई-पंढरपूर मार्गावर धावणारी  २८ डिसेंबरची तर पंढरपूर-मुंबई पॅसेंजर ही २९ डिसेंबरला धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय ५१०२९ मुंबई-विजापुर पॅसेंजर, ५१०३० विजापुर-मुंबई पॅसेंजर, ५१३१७ पनवेल-पुणे पॅसेंजर, ५१३१८ पुणे-पनवेल पॅसेंजर या गाड्या ३१ डिसेंबर रद्द करण्यात आल्या आहेत.