पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आडोशी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली

खंडाळा घाटात दरड कोसळली

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटत पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. आडोशी बोगद्याजवळ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. दगड आणि माती एक्स्प्रेस वेवर आल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या काही दिवसापासून लोणावळा, खंडाळा परिसरामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. 

बोरघाटामध्ये दरड कोसळल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली असून वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. दरड तिसऱ्या लेनवर कोसळल्यामुळे इतर दोन लेन सुरु आहे. मात्र खंडाळा घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरड हटवण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतिही हानी झाली नाही. 

दरम्यान, रविवारी पहाटे देखील याच ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर मुंबईकडे जाणारी एक लेन सुरक्षेच्या कारणास्तव पत्रे लावून बंद करण्यात आली होती. लोणावळा आणि खंडाळा या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आडोशी बोगदा आणि खंडाळा बोगदा परिसरात दरड कोसळून यामध्ये काही प्रवासी आणि वाहनचालकांचा मृत्यू आणि जखमी झाल्याच्या देखील घटना घडल्या होत्या.