पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन तासांसाठी राहणार बंद; या मार्गावरुन करा प्रवास

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (संग्रहित छायाचित्र)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बुधवारी दुपारी दोन तासांसाठी बंद राहणार आहे. १२ ते २ या कालावधीमध्ये काही तांत्रिक कामासाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. पनवेलजवळ ओव्हर हेड गँट्री बसवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास बंद राहणार आहे. 

अपाचे आणि राफेलमुळे पाकिस्तान घाबरला; चीनकडे मागितली मदत

दुपारी १२ ते २ या कालवाधीमध्ये या मार्गावरील सर्व जड आणि मालवाहतूक करणाऱ्या गाड्या खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी थांबवण्यात येणार आहेत. तर कुसगाव टोलनाक्यावरुन जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन वाहतूक वळवण्यात आली आहे. या मार्गावरुन कार आणि इतर प्रवासी गाड्यांना प्रवास करता येणार आहे. दरम्यान, दुपारी एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा विचार करुन प्रवास करावा, असे सांगण्यात आले आहे. 

अल कायदाचा म्होरक्या असीम उमर ठार; मोदींना दिली होती धमकी