'महावितरण'ची उच्चदाब क्षमतेची वीज वाहिनी टाकण्यासाठी मुंबई-पुणे दृतगती महामार्ग (एक्स्प्रेस वे) आज (मंगळवार) दुपारी एक ते दीड या वेळेत दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
ईव्हीएममध्ये घोळ आढळला नाही तर मिशी काढेनः उदयनराजे
परंदवाडी येथे 'महावितरण'च्या उच्चदाब क्षमतेच्या वीजवाहिनीमध्ये झालेल्या बिघाड दुरुस्त केला जाणार आहे. परंदवाडीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर सर्व प्रकारची अवजड, माल वाहतूक करणारी वाहने थांबविण्यात येणार आहेत. मुंबईकडे जाणारी हलकी आणि प्रवासी वाहने किवळे पुलापासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळविण्यात येणार आहेत. तसेच, पुण्याकडे येणारी हलकी, चारचाकी तसेच प्रवासी वाहने ही उर्से टोलनाका येथून जुन्या पुणे-मुंबई मार्गावर वळविण्यात येणार आहेत.