पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरीतील भोसरीमध्ये ३ मुलांची हत्या करुन आईची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात एका आईने  तीन मुलांची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत्य मुलांमद्ये दोन मुली आणि एका चिमुकल्या मुलाचा समावेश आहे. भोसरी परिसरात दुपारी जवळपास साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

फातिमा बागवान (वय-२८) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.  तर, अलफिया बागवान (वय-९),  झोया  बागवान (वय-७) आणि जिआन अक्रम बागवान (वय-६) अशी मृत मुलांची नावे आहेत. दारिद्र्याला कंटाळून या महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भोसरी पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत. महिलेसह मुलांचे मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत फातिमा चार दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबियांसह भोसरी परिसरात राहण्यासाठी आली होती. तिचा पती आक्रम हा फळ विक्रीचा व्यवसाय करतो. पती घरी नसताना फातिमाने मुलांसह आपले जीवन संपवले.