पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मान्सून 'अंदमान'मध्ये दाखल  

मान्सून अंदमानात दाखल

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मोसमी वारे म्हणजे मान्सून आज (शनिवारी) अंदमानात दाखल झाला. १८ ते १९ मे दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मान्सूने आज दक्षिण अंदमानातील काही भाग व्यापल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 

नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पुढच्या सहा ते आठ दिवसांमध्ये तो दक्षिण महाराष्ट्रात येऊन पोहोचतो. स्कायमेटने जारी केलेल्या अंदाजानुसार संपूर्ण जून महिना आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या इतर काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

६ जूनला मान्सूनचे आगमन, स्कायमेटनंतर हवामान विभागाचा अंदाज

मराठवाड्यात सध्याही तीव्र दुष्काळ आहे. येत्या वर्षभरातही त्यामध्ये फारसा बदल होईल, असे वाटत नसल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. 
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे वाटत नाही. काही ठिकाणी सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.