पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भीमा-इंद्रायणी पात्राबाहेर, नदीलगतच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

कुकडी प्रकल्पातील  भीमा, इंद्रायणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात २४ तासांपासून पावसाचा जोर कायम आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने कुकडी प्रकल्पातील  भीमा, इंद्रायणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यातील वाकड येथील रूग्णालयात पाणी, १७० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले 

राजगुरुनगर शहरालगत भीमा नदी काठावर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्मवाडा असून त्याच्याच बाजूला राम मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर आहे. भीमा नदीला आलेल्या पुरामुळे राजगुरूंच्या जन्म वाड्याला पाणी लागले आहे. भीमेचे हे रौद्र रूप पाहण्यासाठी राजगुरुनगर शहरातील नागरिक गर्दी करत आहेत. मात्र, नदीकाठावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वसईतील मिठागरमध्ये ४०० कुटुंब अडकली, हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य 

कुकडी प्रकल्पातील नद्या व भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत आहेत. पावसाची संततधार अजूनही सुरू राहिली तर नदीपात्रात यापेक्षाही जास्त पाणी येण्याची शक्यता भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.