पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील मनसे कार्यालयाला 'भगवा' साज

पुणे मनसे कार्यालय

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे मनसेच्या झेंड्याचा रंग भगवा किंवा केशरी केला जाणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. त्यापूर्वीच पुण्यातील मनसेच्या कार्यालयाचा कायापालट झाल्याचे पहायला मिळत आहे. पुण्यातल्या मनसेच्या कार्यालयाच्या रंगात बदल करुन भगवा रंग देण्यात आला आहे. 

विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना ममता बॅनर्जींचा झटका

राज ठाकर पक्षाची भूमिका आणि पक्षाच्या झेंड्यात बदल करणार आहे. येत्या २३ तारखेला मनसेच्या अधिवेशात ते याची घोषणा करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यापूर्वीच पुण्यातील नारायण पेठ येथील मनसे पक्ष कार्यालयाला भगवा रंग देण्यात आला आहे. या कार्यालयात भगवा झेंडाही लावण्यात आला आहे. त्याचसोबत कार्यालयाबाहेर भगवा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर राज ठाकरे यांच्या फोटोसोबत ‘माझा लढा महाराष्ट्र धर्मासाठी’ असं लिहिलं आहे. त्यामुळे मनसे हिंदुत्वाकडे वळणार असल्याची चर्चा केली जात आहे. 

भाजप-मनसे यांच्यातील युतीसंदर्भात फडणवीस म्हणाले की...