पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसे झेंडा वाद: संभाजी ब्रिगेडकडून राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचे गुरुवारी  पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात अनावरण करण्यात आले. मनसेच्या नव्या भगव्या रंगाच्या झेंड्यावर राजमुद्रा आहे. संभाजी ब्रिगेडने मनसेच्या नव्या झेंड्याला तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात पुण्यातील स्वार्गेट पोलिस ठाण्यात संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे आणि मनसेविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. 

नरेंद्र पाटलांचा मनसेला रामराम; राष्ट्रवादीत केला प्रवेश

राजमुद्रा ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासकीय मुद्रा असून याच राजमुद्रेचा वापर करुन शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले आहे. राजमुद्रेचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करणे हे चुकीचे आहे, असे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले. प्रांत, भाषा, जात, धर्म यावर आधारिक राजकारण करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. यामुळे शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा; विनोद पाटलांची CMकडे तक्रार

राज ठाकरे यांनी राजमुद्रेचा गैरवापर केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. नाहीतर संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, मनसेचा मूळ पहिला झेंडा हा चार रंगाचा होता. जातीच्या नावावर मत मागण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचा वापर केला गेला. परंतु त्यांना यश आलं नाही. राजकारणात चढ उतार होत असतात परंतु मतासाठी जाती - धर्माचा उपयोग करून झेंड्याचा रंग सुध्दा (सरड्यासारखे) सतत बदलतात, असे 'रंग' राजकारणात बदलता येत नाही, असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे. 

निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फाशीपूर्वी अंतिम इच्छा विचारली