पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी मनसेचे पहिले अधिवेशन

राज ठाकरे

येत्या २३ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पहिले अधिवेशन मुंबईत होणार असल्याची घोषणा पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केली. ते पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. विशेष म्हणजे २३ जानेवारीला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्याचदिवशी मनसेचे अधिवेशन होणार आहे.

शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांचे शिबीर झाले. शनिवारी (आज) पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे शिबीर होणार असल्याचे राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

निवडणुकीनंतर महाराष्ट्रात जे घडलं तो मतदारांचा अपमान - राज ठाकरे

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी अधिवेशन बोलावण्यामागचे कारण काय असा सवाल विचारला असता त्यांनी त्याचदिवशी कार्यक्रमासाठी हॉल मिळाल्याचे सांगितले. मुंबईत १० ते १५ हजार लोक बसण्याची क्षमता असलेला हा हॉल आहे, आणि त्याचदिवशी तो उपलब्ध होत असल्याचे त्यांनी म्हटले. 

आर्थिक मंदीवरुन लक्ष हटवणाऱ्या अमित शहांचं अभिनंदनः राज ठाकरे

तत्पूर्वी, एनआरसी आणि सीएएवरुन त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. मंदीवरुन लक्ष हटवण्यासाठी मोदी-शहा यांची ही खेळी होती, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) विविध कंगोरे आहेत. १३५ कोटींच्या देशाला आणखी लोकांची गरजच काय आहे, असा म्हणत आधीच इथल्या लोकांच्या समस्या मिटल्या नाहीत मग दुसऱ्या देशातील लोकांना आपल्याकडे का घ्यायचे, असा सवाल त्यांनी केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mns first party session in mumbai on 23 January 2020 on the birth anniversary of balasaheb thackeray