पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरे २० डिसेंबरपासून पुणे दौऱ्यावर; पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे २० तारखेपासून पुणे दौऱ्यावर जाणार आहे. पुण्यामध्ये २०-२१ डिसेंबर रोजी मनसे पदाधिकाऱ्यांचे शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या शिबिरा दरम्यान पक्ष बांधणी आणि पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

 

जयपूरमधील ९ बॉम्बस्फोटांप्रकरणी चौघे दोषी, एकाची सुटका

दरम्यान, विधानसभा निवडणूकीनंतर पुन्हा एकदा मनसे सक्रीय झाली आहे. विधानसभा निवडणूक मनसेने स्वबळावर लढवली होती. मनसेने १०० उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र या निवडणूकीमध्ये मनसेला फक्त एका जागेवर विजय मिळवण्यात यश आले होते. आता पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

निर्भया प्रकरण: दोषी अक्षयची फाशी कायम