पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

औरंगाबादला जाण्यापूर्वी राज ठाकरे 'दगडूशेठ'च्या चरणी

राज ठाकरे यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले

पक्षाचा बदलेला ध्वज आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन पक्षात नव्याने प्राण फुंकण्याचा प्रयत्न करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यव्यापी दौऱ्यावर निघाले असून त्याची सुरुवात औरंगाबादपासून होणार आहे. तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर मनसेचे नेत बाळा नांदगावकर हेही होते. दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर ते औरंगाबादला रवाना झाले. 

राम शिंदेच्या याचिकेवरून हायकोर्टाची रोहित पवार यांना नोटीस

राज ठाकरे हे आजपासून दि. १५ पर्यंत औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईहून ते बुधवारी निघाले. पुण्यात रात्री मुक्काम केल्यानंतर त्यांनी गुरुवारी सकाळी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी होती. कार्यकर्त्यांच्या हाती मनसेचा नवा झेंडा दिसून आला. 

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांवरून कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

राज हे १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता औरंगाबाद शहरात येतील. बाबा पेट्रोल पंप येथे सत्कार स्वीकारून क्रांती चौक, पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरामार्गे मिल कॉर्नरपर्यंत ते जाणार आहेत. या सर्व ठिकाणी ते पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. मनसे या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करणार आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील

राज ठाकरे आपल्या दौऱ्यादरम्यान शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, मनपा निवडणुकीत सर्व ११५ जागा मनसे लढवणार आहे.