पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर्थिक मंदीवरुन लक्ष हटवणाऱ्या अमित शहांचं अभिनंदनः राज ठाकरे

राज ठाकरे (ANI)

मी कधी नव्हे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करतो. आर्थिक मंदीवरुन लक्ष हटवण्याचे काम अमित शहा यांनी व्यवस्थित केले आहे, अशी उपहासात्मक टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. ते पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिबिरासाठी ते सध्या पुण्यात आहेत. 

फडणवीसांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत, शिवसेनेची टीका

मंदीवरुन लक्ष हटवण्यासाठी मोदी-शहा यांची ही खेळी होती, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) विविध कंगोरे आहेत. १३५ कोटींच्या देशाला आणखी लोकांची गरजच काय आहे, असा म्हणत आधीच इथल्या लोकांच्या समस्या मिटल्या नाहीत मग दुसऱ्या देशातील लोकांना आपल्याकडे का घ्यायचे, असा सवाल त्यांनी केला. 

अनेक पिढ्या इथे राहत असलेल्या मुसलमानांना असुरक्षित वाटण्याचे कारणच नाही. भारत म्हणजे धर्मशाळा नाही. बाकीच्या देशातील लोकांना इथे सामावून का घ्यायचे? बांगलादेश, पाकिस्तानातील मुसलमानांना हकलून लावलेच पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडले. सध्या निघत असलेल्या मोर्चांमध्ये नेमके स्थानिक मुसलमान किती आणि कुठले आहेत? असले कायदे आणून गोंधळ निर्माण करण्याची गरजच नव्हती. 

३१ डिसेंबरपूर्वी ही चार कामे नक्की संपवा, मगच नव्या वर्षाचे स्वागत करा

आपल्या भागात कुठल्या देशातले कुठे राहतात, हे पोलिसांना माहीत असते. पण त्यांचे हात बांधलेले असतात. मुंबईत अनेक ठिकाणी बांगलादेशी मुसलमानांच्या वसाहती आहेत. पोलिसांना याची माहिती आहे. पण ते काहीच करु शकत नाहीत. 

बाहेरचे लोक इथे आणण्याची गरज नाही, असे म्हणत हा हाताबाहेर गेलेला देश असल्याची टीका त्यांनी केली. भाजपसह कोणत्याच पक्षाने यावर राजकारण न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. 

एक पाऊल पुढे!, राहुल द्रविडच्या मुलाचं खणखणीत द्विशतक

इथे हिंदू-मुस्लीम असा विषय घेऊन चालणार नाही. आपला देश अजून ओझे घेऊ शकत नाही. बाहेरच्या लोकांना पोसण्याची गरज नाही. स्थानिक मराठी मुस्लिम कधीच आंदोलने करत नाहीत. नोटबंदीवेळी जो गोंधळ झाला होता. तसाच गोंधळ सध्या दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.