पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील बैठकीत 'राज' की बात, पदाधिकाऱ्यांची मोबाईलशिवाय एंट्री

राज ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आपला कोणताही उमेदवार नसताना 'लाव रे तो व्हिडिओ' असं म्हणत भाजपविरोधात आवाज उठवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता आगामी विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. ते तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी आज (रविवारी) पुण्यातील अशोक नगरमधील क्लब हाऊसमध्ये काही पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे मोबाईल गेटवरच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.  

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेची भुमिका काय असेल? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनसे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार की मनसे स्वतंत्र लढणार याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. यापूर्वी  राज ठाकरे  यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर राज ठाकरे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

पुण्याचा दौरा आटोपल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे  बैठक घेणार असल्याचे समजते. राज्याच्या दौऱ्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.