पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरे यांनी घेतले कसबा गणपतीचे दर्शन

राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पुण्यातील पहिली प्रचारसभा बुधवारी अचानक पडलेल्या तुफान पावसामुळे ऐनवेळी रद्द करावी लागल्यानंतर गुरुवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. राज ठाकरे यांची गुरुवारी संध्याकाळी मुंबईत दोन ठिकाणी सभा होणार आहे. त्यासाठी मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांचे मंदिर परिसरात औक्षण करण्यात आले. अनेक कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंदिर परिसरात उपस्थित होते.

शिवसेनेत धुसफूस कायम, कल्याणमध्ये २६ नगरसेवकांचे राजीनामे

गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्दयांवर आपल्या ठाकरी शैलीत व्यक्त न झालेले राज ठाकरे आता निवडणुकीच्या प्रचारात कोणकोणते मुद्दे उपस्थित करणार, सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची कोंडी करण्याचा कसा प्रयत्न करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभा संपूर्ण महाराष्ट्रात गाजल्या होत्या. त्यांनी निवडणुकीत उपस्थित केलेले मुद्दे राज्यात चर्चेत आले होते. सोशल मीडियातही त्यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ'ची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले नव्हते. पण आता विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रचाराला आणखी महत्त्व आले आहे.

'चंपा'ला शरद पवारांशिवाय काहीच दिसत नाहीः अजित पवार

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची सक्तवसुली संचालनालयाने चौकशी केली होती. त्यावेळीही सरकार जाणीवपूर्वक विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका करण्यात आली होती. पण या चौकशीनंतर राज ठाकरे यांनी कोणतेही मोठे वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांकडे विरोधकांचेही लक्ष लागले आहे. युतीविरोधात उभ्या ठाकलेल्या आघाडीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने प्रवेश केलेला नाही. पण काही मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष निवडणुकीत काय परिणाम होणार हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.