पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अन्यथा दंडात्मक कारवाई करु, बेपत्ता होम क्वारंटाइन लोकांना पुणे पोलिसांचा इशारा

होम क्वारंटाइन

होम क्वारंटाइन असलेल्या  मात्र गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नागरिकांचा पुणे पोलिस शोध घेत आहेत. या बेपत्ता व्यक्तींनी लवकर घरी परतावे अन्यथा दंडात्मक कारवाई करु असा कडक इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

परदेशातून राज्यात आलेल्या व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी या व्यक्तींना १४ दिवस घरीच थांबण्यासाठी सांगण्यात येत आहे. असं असतानादेखील या व्यक्ती घरातून बाहेर पडल्याचं आढळून आलं आहे. स्वत:बरोबर इतरांच्या जीवाचीही पर्वा न करता रुग्ण होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या व्यक्ती राज्यात  सार्वजनिक ठिकाणी खुलेआम वावरताना दिसल्या आहेत. या व्यक्तींमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

 

कस्तुरबामधून परत पाठवलेल्या रुग्णाला कोरोना

पुणे पोलिसांच्या १३६ पथकांनी घरीच अलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तींची तपासणी केली होती. गेल्या पंधरा दिवसांत जे  परदेशातून परतले आहेत आणि त्यांना  होम क्वारंटाइन ठेवले आहे  मात्र काही दिवसांपासून ते बेपत्ता आहेत अशा व्यक्तींनी परत यावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असं पुणे पोलिसांनी ट्विट करुन म्हटलं आहे. 

काही होम क्वारंटाइन असलेले लोक आरोग्य मंत्रालयानं घालून दिलेल्या सूचनांचं पालन करत आहेत मात्र काही  बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे, अशा होम क्वारंटाइन व्यक्तींनी हेल्पलाइन नंबरवर फोन करुन पोलिसांशी संपर्क साधावा, परत यावे अन्यथा  दंडात्मक कारवाई असं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.

मुंबई-पुणे येथे कोरोना तपासणी केंद्रांना मान्यता