पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या देखभालीसाठी महापौर निधीतून ७५ लाख देण्याचा प्रस्ताव

मुक्ता टिळक

पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाच्या पुरातन वास्तूचे जतन आणि देखभालीसाठी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी महापौर निधीतून ७५ लाख रुपयांची देणगी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. डेक्कन महाविद्यालयाच्या पुरातन वास्तूचे जतन आणि देखभालीच्या कामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी महाविद्यालयाकडून पुणे महापालिकेकडे करण्यात आली होती.

गरोदर स्त्रीला आशीर्वाद द्यायला आलेल्या तृतीयपंथीयांनी नवऱ्याला लुटले!

सन २०१७ मध्ये महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या छताचे दुरुस्ती काम करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला होता. आता पुन्हा एकदा देखभाल आणि दुरस्ती कामासाठी महाविद्यालयाला निधीची गरज आहे. डेक्कन महाविद्यालय हे देशातील सर्वांत जुन्या तीन महाविद्यालयांपैकी एक आहे. आधी हे महाविद्यालय पूना महाविद्यालय नावाने ओळखले जायचे. ऑक्टोबर १८६४ पासून ते डेक्कन महाविद्यालय म्हणून ओळखले जाऊ लागले. 

पुणे महापालिकेतील पूरातन वास्तू देखभाल विभागातील अभियंता वर्षा जाधव म्हणाल्या, महाविद्यालयातील मुख्य इमारतीचे छत आणि लाकडी बांधकाम यांचे पावसाचे पाणी गळत असल्यामुळे नुकसान झाले आहे. इमारतीच्या एका बाजूचे काम आम्ही पूर्ण केले आहे आणि नव्याने निधी मिळाल्यास दुसऱ्या बाजूचे कामही आम्ही पूर्ण करणार आहोत. मुख्य इमारतीतील जुने लाकूड, जीआय शिट्स बदलण्याचे आमचे नियोजन आहे. 

काश्मिरात पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर, इतिहासकार विश्वनाथ राजवाडे, डॉ. द्वारकानाथ कोटणीस, थोर तत्त्वज्ञ रामचंद्र रानडे ही सर्व दिग्गज नावे या महाविद्यलयाशी जोडलेली आहेत.

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, पुण्यातील या पुरातन वास्तूबद्दल मला आदर आहे. इतिहासाचे एक उदाहरण असलेल्या या वास्तूला आपण जपले पाहिजे. मी माझ्या महापौर निधीतून जितके देणे शक्य आहे. तेवढे देण्याचा प्रयत्न केला आहे.