पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंजवडीतील व्हेरॉक कंपनीला भीषण आग

पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी येथील व्हेरॉक या कंपनीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली.

पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी येथील व्हेरॉक या कंपनीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत कारखाना पूर्णपणे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येते. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे १८ बंब घटनास्थळी दाखल झाले. सकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. व्हेरॉक लायटिंग सिस्टिम प्रा.लि. असे या कंपनीचे नाव आहे. चारचाकी वाहनांचे दिवे तयार करण्याचे काम या कंपनीत केले जाते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

बहावलपूर येथील बॉम्ब प्रूफ घरात लपून बसला आहे 'बेपत्ता' मसूद अझहर

अधिक माहिती अशी, हिंजवडी फेज दोनमध्ये व्हेरॉक ही कंपनी आहे. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले. पुणे अग्निशमन आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे बंब, पीएमआरडीएचे बंब आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. 

'त्या' जहाजमधील आणखी दोन भारतीयांना कोरोनाचा विळखा

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. परंतु, कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.