पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काचेची बाटली डोक्यात फोडली, अल्पवयीन मुलीवर तरुणाची लग्नासाठी बळजबरी

प्रातिनिधिक छायाचित्र

अल्पवयीन मुलीला लग्नासाठी धमकावणाऱ्या २५ वर्षीय तरुणाविरोधात पिंपरी- चिंचवड पोलिस स्थानकात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या मुलानं स्वत:च्याच डोक्यात काचेची बाटली फोडली, लग्न केल्यास  जीवाला इजा पोहोचवण्याची धमकीही त्यानं दिली आहे.  २० डिसेंबरला हा प्रकार घडला. 

पुण्यात परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार; आरोपी फरार

१७ वर्षांची अल्पवयीन विद्यार्थिंनी  घरी परतत असताना तरुणानं कॉलेजच्या गेटबाहेर तिला अडवलं. तिचा बळजबरीनं हातही पकडला. लग्नासाठी हा तरुण मुलीला धमकावू लागला. काचेची बाटली स्वत:च्या डोक्यात फोडून त्यानं धमकावले, इतकंच नाही तर लग्नास नकार दिल्यास स्वत:च्या जीवाला इजा पोहोचवण्याची धमकीही त्यानं मुलीला दिली. संबधीत मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

धावत्या रेल्वेला थांबविण्यासाठी विनाकारण चेन ओढण्याच्या पुण्यात ८५ घटना

ते दोघंही एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात. या प्रकरणाचा आम्ही अधिक तपास घेत आहोत. संबधीत तरुणानं पळ काढला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हा मुलगा वाकड परिसरात राहणारा रहिवाशी आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्या मुलाला कोणतीही इजा झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी हिंदुस्थान टाइम्शी बोलताना दिली.