पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मालेगाव बॉम्बस्फोट: समीर कुलकर्णींना सुरक्षारक्षकांचे कवच

समीर कुलकर्णी

२००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांना सशस्त्र सुरक्षा गार्डचे संरक्षण देण्यात आले आहे. समीर कुलकर्णी यांच्या पिंपरी-चिंचवड येथील निवासस्थानी हा सुरक्षा गार्ड तैनात असणार आहे. कुलकर्णी यांनी याचवर्षी मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती.

 

भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

दरम्यान, समीर कुलकर्णी यांनी आपल्या जीवाला कोणापासून धोका आहे हे स्पष्ट केले नव्हते. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तातडीने सुरक्षा व्यवस्था मिळावी अशी मागणी केली होती. मालेगाव बॉम्बस्फोटात समीर कुलकर्णी हे संशयित आरोपी आहेत. २०१७ मध्ये मुंबईतील सेशन कोर्टाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन दिला होता.   

ही तर मोदी सरकारची घोडचूक, काँग्रेसचा केंद्राच्या निर्णयावर हल्ला

मध्यप्रदेशच्या भोपाळमधील एका प्रिटिंग प्रेसमध्ये समीर कुलकर्णी कर्मचारी होते. मालेगाव बॉम्बस्फोटानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर या बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेल्या रसायनांची व्यवस्था केल्याचा आरोप आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव बॉम्बस्फोट झाला होता. मोटार सायकलच्या सहाय्याने हा बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १२ पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. 

भगवे फेटे बांधून भाजपचे विधीमंडळ परिसरात शक्तीप्रदर्शन