पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डीएसके घोटाळा: मकरंद कुलकर्णींना १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

डीएसके

डीएसके घोटाळा प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या मकरंद कुलकर्णी यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी पोलिसांनी मकरंद कुलकर्णी यांना मुंबईतून अटक केली होती. कोट्यवधी रुपयांच्या डीएसके घोटाळा प्रकरणामध्ये मकरंद कुलकर्णी यांचा देखील सहभाग आहे.

WTO कडून भारत-चीन या राष्ट्रांना मिळणारा 'लाभ' अमेरिकेसाठी 'तोट्या'चा

मकरंद कुलकर्णी हे डी. एस. कुलकर्णी यांचे बंधू आहेत. अमेरिकेला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. मुंबई विमानतळावरुन त्यांना अटक करण्यात आले होते. पुण्यामध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त गुंतुणुकदारांची २०४३ कोटींची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप डी. एस. कुलकर्णी यांच्यावर आहे.

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये तयार होणार 'मोदी मार्ग'

डीएसके कंपनीमध्ये मकरंद कुलकर्णी हे प्रवर्तक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिस मकरंद कुलकर्णी यांचा शोध घेत होते. पण ते सापडत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात 'लुकआऊट नोटीस' काढली होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानी पोलिस कोठडीमध्ये करण्यात आली आहे.

अजिंक्य रहाणेनंतर सचिन तेंडुलकर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आला धावून