पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या रविवारी रात्री ९ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करून टॉर्च किंवा मेणबत्ती लावण्याच्या आवाहनाला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे अत्यावश्यक सेवांवर परिणाम होईल. एकाचवेळी घरातील सर्व दिवे बंद करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी फेरविचार केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. एका संदेशात त्यांनी नागरिकांना घरातील लाईट बंद न करता टॉर्च किंवा मेणबत्ती लावण्याची सूचना केली आहे.
परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणे शक्य नाही: केंद्र सरकार
नितीन राऊत म्हणाले की, एकाचवेळी सगळ्यांनी लाईट बंद केले तर त्यामुळे ग्रीड फेल होऊ शकतो. त्यामुळे त्याचा परिणाम अत्यावश्यक सेवांवरही होऊ शकतो. या स्थितीत ग्रीड फेल झाल्यास पुन्हा सर्व पूर्ववत करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधीही लागू शकतो. त्यामुळे घरातील दिवे बंद न करता नागरिकांनी टॉर्च किंवा मेणबत्ती लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
श्वासातून आणि बोलण्यातूनही कोरोनाचा संसर्ग शक्य - संशोधन
एकाचवेळी देशातील सगळ्यांनी दिवे बंद केल्यामुळे विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये अंतर पडू शकते. लॉकडाऊन असल्यामुळे विजेची मागणी पहिल्यापासून २३००० हजार मेगावॉटवरून १३००० मेगावॉटपर्यंत खाली आली आहे. अनेक कंपन्या आणि कारखाने सध्या बंद आहेत. त्यामुळे विजेची मागणी कमी आहे. या स्थितीत एकदम सगळ्यांनी दिवे बंद केले तर त्यामुळे ब्लॅकआऊट होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.