पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे मेट्रोसंदर्भात उप-मुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय

अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत मेट्रोसंदर्भातील मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मेट्रोचे प्रस्तावित ६ कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने सुरु करण्याऐवजी सर्व कॉरिडॉरची कामे एकाच वेळी सुरु करण्यासंदर्भातील डीपीआर (विकास आराखडा) तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पुणे मेट्रोचं नाव बदलून 'पुणे-पिंपरी चिंचवड महामेट्रो' असं करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिली आहे.  

जुन्या मित्रांच्या चांगल्या गोष्टींवर घाव घालणार नाही : CM ठाकरे

पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्ग वाढवून निगडी कात्रज असा करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. वनाज रामवाडी मार्ग वाढवून तो चांदणी चौक ते वाघोली असा होणार आहे. शिवाजीनगर हिंजवडी हा पीएमआरडीए करत असलेला मेट्रो चा मार्ग शिवाजीनगर माण असा वाढवण्यात येणार आहे. हडपसर स्वारगेट हा मार्ग नव्याने प्रस्तावित आहे. तर निगडी चाकण मेट्रो मार्गाची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. खडकवासला ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग देखील प्रस्तावित आहे. वारजे ते शिवाजीनगर या मार्गाचा विचार करण्याबाबत सूचनाही अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या आपच्या आमदाराला BJPचे तिकीट

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना पुणे ते मुंबई हायपरलूप बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावरही त्यांनी भाष्य केले. हायपरलूप जगात कुठे ही अस्तित्वा नाही. जगाच्या पाठिवर एखाद्या ठिकाणी १० किमी जरी असा प्रकल्प बांधला गेला. त्याला यश मिळाले तर आपल्या इकडे चाचणी घेण्यासंदर्भात विचार निश्चित करु, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.