पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज

कोरोना तपासणी

राज्यातील पहिल्या कोरोनाबाधित जोडप्याला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दाम्पत्यांचा १४ दिवसांचा विलगीकरण काळ संपल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली, दिलासादायक बातमी म्हणजे या चाचणीचे दुसरे अहवालही कोरोना विषाणू निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळे नायडू रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्या १४ दिवसांत काय केले, कोरोनाबाधित पुण्यातील दाम्पत्यानं सांगितला अनुभव

सोमवारी या जोडप्याच्या १४ दिवसांनंतर पुन्हा चाचण्या करण्यात आल्या त्यातला  एक अहवाल निगेटीव्ह आला. तर दुसरा अहवाल हा नॅशनल इन्सिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पुन्हा पाठवण्यात आला तोदेखील निगेटीव्ह  आला.  ९ मार्च रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर या जोडप्याला  नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. हे दाम्पत्य राज्यातील कोरोना बाधित पहिले रुग्ण होते. दुबई सहलीवरून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. या जोडप्याच्या मुलीला देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर या तिघांना उपचारांसाठी नायडू रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. 

राज्य सरकार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरुन देणार कोरोनाची माहिती

कस्तुरबा रुग्णालयातून कोरोनामुक्त ८ रुग्णांना डिस्चार्ज
मुंबईतल्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार घेत असलेले १२ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या १२ रुग्णांपैकी ८ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

देश लॉकडाऊन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.२१ दिवस हे निर्बंध लागू असतील. 

घरीच थांबा! पोस्टर दाखवत मोदींनी दिला हा संदेश