पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'काश्मीरमध्ये तिरंगा फडकल्याचा आम्हालाही अभिमान, पण...'

अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी कलम ३७० च्या मुद्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित करत राज्यासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पुण्यात आयोजित कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते. काश्मीर खोऱ्यात तिरंगा फडकला याचा आम्हालाही अभिमान आहे. पण तिथल्या लोकांनी ऐकेकाळी निवडून दिलेल्या नेत्यांना ४० ते ४५ दिवस नजर कैदेत ठेवण्यासारखा प्रकार जगातील कोणत्याही लोकशाही असलेल्या देशात दिसत नाही.

'कलम ३७० काँग्रेससाठी राजकीय तर भाजपसाठी देशभक्तीचा मुद्दा' 

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यापासून फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुला आणि मेहबुबा मुफ्ती नजर कैदेत आहेत. गुलाब नबी आझाद यांना जम्मू काश्मीरमध्ये जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागली. आपल्याच देशातील एखाद्या भागात जाण्यासाठी कोर्टात धाव घ्यावी लागते, हे कशाचे द्योतक आहे? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले, ग्रामीण भागातला शेतकरी रसातळाला गेला असताना आणि छोटा-मोठा व्यापारी उद्वस्त झाला असताना लोकसभेच्या निवडणुकांवेळी पुलवामा आणि सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा उपस्थित करुन सत्ताधाऱ्यांनी राजकारण केले.

निवडणुकीनंतरही राज्यात पुन्हा 'देवेंद्र'च, अमित शहांचे शिक्कामोर्तब

त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आता जम्मू काश्मीरमधील कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला जात आहे.   
मुळात उद्याच्या निवडणुकीत कलम ३७० चा मुद्दा नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे. आगामी निवडणूक चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्राची आहे. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी शेती उद्योग उद्धवस्त झालाय. राज्यातील काही भागात दुष्काळ परिस्थिती आहे. पाण्याकरता अंदोलन करावे लागते. या मुद्यांवरही निवडणूक महत्त्वाची असेल, असे अजित पवार म्हणाले.  

कुछ भी हो, न हो, हमारी जीत पक्की हैः अमित शहा

ते पुढे म्हणाले की,  कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्याची ही वेळ आहे. मागील पाच वर्षांत फडणवीस सरकारने राज्याला कर्जबाजारी केले, असा आरोपही त्यांनी राज्य सरकारव केला. ते म्हणाले की, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून २०१४ मध्ये अर्थमंत्रीपद सोडेपर्यंतच्या ५४ वर्षांत राज्यावर अडीच लाख कोटी कर्ज होते. या सरकारने पाच वर्षांत अडीच लाख कोटी कर्ज केले आहे, असा दाखलाही अजित पवारांनी यावेळी दिला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly elections 2019 ncp leader ajit pawar question fadnavis govt on artical 370