पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या फोटोसह झळकणाऱ्या जाहिराती हटवण्याचे आदेश

मोदींचे बॅनर्स हटवण्याचे आदेश

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र पुणे शहरातील पेट्रोल पंप आणि सार्वजनिक ठिकाणी तसेच काही बसेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहिरातीचे फलक झळकताना दिसत होते. यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे  तक्रार दाखल केल्यानंतर मोदींच्या फोटोसह असलेल्या जाहिरातींचे फलक काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

आम्ही सूडबुद्धीने वागणारे नाही, उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

पुण्याच्या उप जिल्हाधिकारी सुरेखा माने यांनी यांदसर्भातील आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह शहरातील पेट्रोल पंप, राज्य परिवहन बसेस आणि रेल्वे स्थानकांवर झळकणाऱ्या फलबाजीसंदर्भात योग्य ती कारवाई करुन यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असा उल्लेख जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात केला आहे.

राज्य बँकेत एका पैशाचाही भ्रष्टाचार नाहीः अजित पवार

काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी मोदींच्या फोटोसह सार्वजनिक ठिकाणी तसेच पेट्रोल पंपावर  झळकणाऱ्या जाहिरातींवर आक्षेप नोंदवला होता. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra assembly elections 2019 EC issues order to remove billboards with PMs photo at petrol pumps bus terminals in Pune