पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा?

माधुरी मिसाळ

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये २०१४ साली राज्यात पहिला निकाल पुणे शहरातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचा लागला होता. त्यावेळी या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले होते. यावेळीही पर्वती विधानसभा मतदारसंघाचाच निकाल राज्यात पहिला येणार का हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

'हिरकरणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा

पर्वती विधानसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा एकदा भाजपने माधुरी मिसाळ यांनाच उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेविका अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांमध्ये कडवी टक्कर असल्याचे प्रचारावेळी दिसून आले होते. माधुरी मिसाळ या पुणे शहर भाजपच्या अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. 

खासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील ३ ते ४ तासांत पहिला निकाल लागू शकतो, अशी माहिती मिळाली आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि पुणे कँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातही लवकर निकाल लागू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून महापौर मुक्ता टिळक यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून अरविंद शिंदे रिंगणात आहेत. तर पुणे कँन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपच्या सुनील कांबळे यांच्याविरोधात काँग्रेसकडून रमेश बागवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्षही आहेत.