पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर

रोहित पवार

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्याच्या समारोपावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. गरज पडली की शरद पवार यांचा सल्ला घ्यायचा, गरज पडली की बारामतीत येऊन शरद पवार यांचं कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं शरद पवार यांनी काय केलं?, असा सवाल करीत रोहित पवार यांनी विरोधी भाजपवर टीका केली.

डॉक्टरांवर हल्ला केल्यास १० वर्षे शिक्षा, केंद्राकडून मसुदा तयार

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी आपल्या विचारांना मोकळी वाट करून दिली. त्यांच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी ही पोस्ट शेअर केली असून, हजारो लोकांनी लाईक केली आहे. 

फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, शरद पवार यांचे राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवाव अस निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षांत तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. शरद पवार यांच्यामुळे ज्याने शेतीतून चार पैसै कमावले, त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेऊन नोकरी केली आणि त्याचा नातू आज आयटी कंपनीत नोकरी करु शकतो. शेतीपासून ते आयटी पार्क उभा करण्यापर्यंतची ही शृंखला आहे.

महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दीनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता शरद पवार यांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपातीमध्ये, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे, असेही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पहिले राफेल विमान याच महिन्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात

शरद पवार यांनी १५ वर्षांत राज्यासाठी काय केले? हे पत्रकार परिषद बोलवून सांगावे, असे आव्हान अमित शहा यांनी दिले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांनी भ्रष्टाचाराशिवाय काही केले नाही. आघाडीच्या काळात राज्यासह केंद्रात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला. दोन्ही पक्षांनी नेहमी घराणेशाहीला प्राधान्य दिले, अशी टीका त्यांनी केली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 rohit pawar writes post on fb in favor of sharad pawar and ask questions to bjp