पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोहित पवार औपचारिकपणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारीची मागणी

रोहित पवार

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ज्याची चर्चा सुरू होती, ती अखेर औपचारिकपणे खरी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केला आहे. आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की मी याच मतदारसंघातून निवडणूक लढवावी. त्यासाठीच मी येथून पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

वंचित आघाडी संघ स्वयंसेवकांच्या हाती, लक्ष्मण मानेंचा गंभीर आरोप

येत्या ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक होते आहे. त्यासाठी रोहित पवार यांनी नगर जिल्ह्याच्या अध्यक्षांकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. सध्या राज्यात मंत्री असलेले राम शिंदे हे सलग दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे जर रोहित पवार यांना येथून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली, तर या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. 

२०१७ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून रोहित पवार यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यासोबत विविध दौऱ्यांमध्ये रोहित पवार दिसताहेत. रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेडमधील कार्यकर्त्यांची इच्छा होती की मी तिथूनच निवडणूक लढवावी. मी गेल्या काही वर्षांपासून या भागात काम करतो आहे. 

VIDEO: खड्ड्यांवरून नीतेश राणे आणि कार्यकर्त्यांची अभियंत्यावर चिखलफेक

रोहित पवार हे बारामती ऍग्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्याचबरोबर अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेची बाजू ते विविध माध्यमांपुढे मांडताना बघायला मिळतात.