पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे : पोलिसांनी पोस्टाच्या माध्यमातून बजावला मतदानाचा हक्क

पोलिसांनी पोस्टाच्या माध्यमातून केले मतदान

भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने आपल्याला दिलेल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. २१ ऑक्टोबर रोजी राज्यभरात मतदान पार पडणार आहे. राज्यभरात मतदान प्रक्रिया सुरळीत पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कर्तव्यदक्षता बजावण्यासाठी उद्या मतदान केंद्राबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या तसेच अन्य ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पोस्टाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोस्टाच्या माध्यमातून मतदान केले.

 विधानसभा निवडणूक २०१९: असे शोधा मतदार यादीत नाव, मतदान केंद्र

मतदान प्रक्रिया पार पाडण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानाला मुकावे लागू नये याकरिता निवडणूक आयोग पोस्टल मतदान सुविधा उपलब्ध करून देत असते. या सुविधेचा जास्तीत जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपयोग करावा, असे आवाहन  पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांनी केले होते. त्यानुसार दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील सर्वांनी पोस्टल बॅलेट द्वारे मतदान केले. यासंबधी  वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी माहिती दिली आहे.