पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बारामतीः मुख्यमंत्र्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांचा लाठीमार

बारामती येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बारामतीमध्ये महाजनादेश यात्रा घेऊन गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यावेळी तिथे असलेले कार्यकर्ते मुख्यमंत्री भाषण करत असतानाच 'एकच वादा, अजितदादा' अशा घोषणा देऊ लागले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण आवरते घेतले. यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. यामुळे कार्यकर्ते संतप्त झाल्याचे दिसले.

'मातोश्री'वरील कर्मचाऱ्यांना तीन वेळा डिलिव्हरी बॉयनं लुबाडलं

महाजनादेश यात्रा बारामतीमध्ये येण्यापूर्वीपासूनच राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि भाजपत वाद रंगल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीने सभेसाठी उभारलेल्या साऊंड सिस्टिमला विरोध केला होता. नगरपरिषदेच्या समोर सभेसाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी रथावरुनच भाषण केले. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. 'बुरे काम का बुरा नतीजा होता है', गळती लागली आहे, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'एकच वादा, अजितदादा' अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पवारांविरोधात बोलल्याने आणि पोलिसांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते प्रचंड संतापले होते.

काँग्रेसमध्ये मिलिंद देवरांकडे राष्ट्रीय स्तरावरील मोठी जबाबदारी येण्याची शक्यता

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ncp party worker disturbed cm devendra fadnavis speech in baramati in maha janadesh yatra