पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणुकीत आपली 'कमाल' दाखवणारे चार उमेदवार!

भाजपपेक्षा काँग्रेस ठरले भारी

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर विजयी आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांची सर्व आकडेवारीही आता समोर आली आहे. या आकडेवारीमधून अनेक लक्षवेधी गोष्टी समोर आल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण चार ठिकाणी विजयी उमेदवाराने त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर तब्बल एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतले आहे. 

सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले पाच उमेदवार कोण माहितीये?

विधानसभा निवडणुकीत लाखाचे मताधिक्य मिळवणे वाटते तितके सोप्पे नसते. कारण हे मतदारसंघ लहान असतात. एका मतदारसंघात साधारणपणे तीन लाख मतदार असतात. त्यातही प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या त्याहूनही कमी असते. त्यामुळे लोकसभेत लाखाचे मताधिक्य मिळवता येते. पण विधानसभा निवडणुकीत खूप कमी जणांना लाखाचे मताधिक्य घेता येते. जर संबंधित मतदारसंघातील निवडणूक खूपच एकतर्फी झाली तरच लाखाचे मताधिक्य घेता येते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार उमेदवारांना लाखाचे मताधिक्य गाठण्याची कमाल दाखवता आली आहे. 

बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार गोपीनाथ पडळकर यांचा तब्बल १६५२६५ मतांनी पराभव केला.

हरियाणातील फॉर्म्युल्यानंतर शिवसेनेची 'बार्गेनिंग पॉवर' आणखी वाढली

सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी १६२५२१ मतांनी विजय मिळवला आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार किसन कथोरे १३६०४० मतांनी विजयी झाले आहेत. 

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज देशमुख १२१४८२ मतांनी विजयी झाले आहेत. धीरज देशमुख यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली असून, त्यांनी मोठ्या फरकाने विजय संपादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 list of four winners who gets lead of more than on lakh