पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायकपणे पिछाडीवर असलेले राज्यातील महत्त्वाचे उमेदवार

विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. राज्यातील काही मतदारसंघांमध्ये महत्त्वाचे उमेदवार पिछाडीवर आहेत. या ठिकाणी हीच स्थिती राहिली तर धक्कादायक निकाल लागू शकतात.


पिछाडीवर असलेल्या उमेदवारांची नावे


१. परळी मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. या मतदारसंघातून पंकजा मुंडे पराभूत झाल्या आहेत.

२. मावळ मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार आणि मंत्री बाळा भेगडे पिछाडीवर आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीचे सुनील शेळके आघाडीवर आहेत. या मतदारसंघातून बाळा भेगडे पराभूत झाले आहेत.

३. पुरंदर मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि मंत्री विजय शिवतारे पिछाडीवर आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप आघाडीवर आहेत. या मतदारसंघातून विजय शिवतारे पराभूत झाले आहेत.

४. सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील आघाडीवर आहेत. या मतदारसंघातून उदयनराजे भोसले पराभूत झाले आहेत.

५. जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर पिछाडीवर आहेत. या मतदारसंघातून अर्जुन खोतकर पराभूत झाले आहेत.

६. कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार आणि मंत्री राम शिंदे पिछाडीवर आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आघाडीवर आहेत. या मतदारसंघातून राम शिंदे पराभूत झाले आहेत.

७. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून विद्यमान भाजप आमदार अमल महाडिक पिछाडीवर आहेत. या ठिकाणी काँग्रेसचे ऋतुराज पाटील आघाडीवर आहेत. या मतदारसंघातून अमल महाडिक पराभूत झाले आहेत.

८. बारामती मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर पिछाडीवर आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आघाडीवर आहेत. या मतदारसंघातून गोपीनाथ पडळकर पराभूत झाले आहेत.

९. नांदगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत.