पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बिग बॉस'च्या घरातील चेहरा विधानसभेच्या रिंगणात उतरणार

अभिजीत बिचुकले

मराठी बिग बॉसच्या घरातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला चेहरा म्हणजे अभिजीत बिचुकले आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत.  कुण्या पक्षाच्या वळचणीला न जाता अखिल बहुजन समाज सेनेच्या स्वतंत्र पक्षाच्या माध्यमातून ते जनतेला साद घालणार आहेत. आगामी विधानसभेच्या २८८ जागांवर लढणार असल्याची माहिती त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली. 

ईडीच्या कारवाईशी राज्य सरकारचा संबंध नाहीः मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांच्या प्रदेशात आज या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांची अवस्था, उद्योजकांची अवस्था किती चांगली? आणि किती वाईट? आहे याची राज्यातील जनतेला जाणीव आहे.  या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी अभिजीत वामनराव आवाडे बिचुकले एक स्वतंत्र पक्ष अखिल बहुजन समाज सेना हा घेऊन येतोय, असे ते म्हणाले.  मी माझ्या पक्षातर्फे आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये २८८  जागा लढवणार आहे. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम समाजसेवी कार्यकर्त्यांना, लोकनेत्यांना व होतकरूंना आणि सर्व पक्षांमध्ये कित्येक वर्षे एकनिष्ठ काम करून त्याठिकाणी आपला शिक्का जमून सुद्धा पक्षश्रेष्ठींनी डावललेल्या सर्व लोकांना पक्षांमध्ये सामील होण्याचे आव्हान अभिजित बीचुकले यांनी केले आहे. 

येत्या शुक्रवारी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार - शरद पवार

'बिग बॉस मराठी' या रिआलिटी शोच्या माध्यमातून मी  घराघरांमध्ये मी पोचलो आहे.  मी किती खरा माणूस आहे हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. लहानपणापासून मुख्यमंत्री होण्याच एक स्वप्न उराशी बाळगून आहे. यामागे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील समविचारी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे तसेच अखिल बहुजन समाज सेना पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन अभिजीत बिचुकले यांनी केले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2009 big boss marathi fame Abhijit Bichukale will contest All 288 seats in maharashtra Assembly