पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘सीएए’विरोधातील भूमिकेबाबत अजित पवारांचं स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मते सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)  आणि एनआरसीमुळे राज्यात कोणालाही कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. आमचे  देखील हेच मत आहे'', अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली.  सीएएला देशातील अनेक राज्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. काही बिगर भाजपा राज्यांनी या कायद्याविरोधात ठरावही मंजूर केले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातही या कायद्याविरोधात ठरावाच्या शक्यतेबाबत विचारले असता अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान भारतात येण्याची शक्यता

“देशात केरळ, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात ठराव मंजूर केला आहे. या राज्यात एकाच पक्षाची सत्ता आहे. महाराष्ट्रात मात्र तशी परिस्थिती नाही.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मते सीएए आणि एनआरसीमुळे राज्यात कोणालाही कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. आमचंही हेच मत आहे'', असं अजित पवार म्हणाले. 

 

कोरोना विषाणू : महाराष्ट्रात सहा संशयित रुग्ण

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षानं मिळून तयार झालेलं महाविकास आघाडीचं सरकार आहे. म्हणून कायद्याबाबत काय नवं सरकार काय  भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, सीएए विरोधात राज्याकडून ठराव मांडण्यात येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

शोएब अख्तर म्हणाला, भारतीय संघ निर्दयी बनत चाललाय