पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधानपदी पप्पू हवाय की शरद पवार, उद्धव ठाकरेंचा सवाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

विरोधकांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. विरोधी आघाडीच्या प्रत्येक नेत्यांना पंतप्रधान पदाची आकांक्षा आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीवर हल्लाबोल केला. तसेच लोकांना पंतप्रधानपदी पप्पू हवाय की शरद पवार, असा सवाल ही त्यांनी केला आहे. 

मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुर मतदार संघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संयुक्त प्रचार सभेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, मागील तीन वर्षांपासून आमचे भाजपबरोबर मतभेद असले तरी केवळ कणखर नेतृत्वामुळे आम्ही हातमिळवणी केली आहे. नरेंद्र मोदी हे देशातील कणखर नेते आहेत. भाजप आणि शिवसेना एकत्रित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवेल. 

विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता पंतप्रधानपदी पप्पू हवा की शरद पवार असा खोचक सवाल केला.

काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी राजद्रोहाचा कायदा रद्द करण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. लोक अशा पक्षाला निवडून देतील का ? विरोधक सरकारवर सर्जिकल स्ट्राईकवरुन टीका करत आहेत. त्याचवेळी ते सर्जिकल स्ट्राईकवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. असे करुन ते सैनिकांचा अपमान करत आहेत. 

यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. शेतकऱ्यांनी पाणी मागितले होते त्यावेळी अजित पवार यांनी त्यांचा अपमान केला होता. शिरुर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. कोल्हे यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली. पण त्यांची एकनिष्ठता मात्र त्यांनी शिकलेली नाही, असा टोलाही लगावला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 will people want pappu or pawar as pm says shiv sena chief uddhav thackeray