पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरी मतदारसंघ आम्हाला हवा, रिपब्लिकन पक्षाची सेनेकडे मागणी

श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप

लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघामध्ये तुम्हाला संपूर्ण मदत करू, पण पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघ आमच्यासाठी सोडला पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थानिक नेत्यांनी केली. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी ही मागणी केली. मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीरंग बारणे यांनी भाजपचे स्थानिक नेते आणि आमदार लक्ष्मण जगताप याचबरोबर इतर नेत्यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीत आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा राहिल. पण विधानसभा निवडणुकीत पिंपरीचा मतदारसंघ तुम्हाला आमच्यासाठी सोडावा लागेल, असे या नेत्यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन त्यांना भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांचा प्रचार करण्याची सूचना केली आहे. 

या संदर्भात श्रीरंग बारणे म्हणाले, त्यांचे नक्की प्रश्न काय आहेत, ते आम्ही जाणून घेतले. सध्या तरी रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते आमच्यासाठी प्रचार करायला तयार आहेत. पण त्यांनी विधानसभेला पिंपरीच्या जागेची मागणी केली आहे. या संदर्भातील निर्णय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील.

आमच्या पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना युतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे मी सांगितले आहे. आता पिंपरीमध्ये स्थानिक पातळीवर त्यांची काही मागणी असेल, तर मी नक्कीच त्यामध्ये लक्ष घालेन, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Republican Party of India to support Barne demand Pimpri assembly seat in return