पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे: मतमोजणीची पहिली फेरी सकाळी १० पर्यंत पूर्ण होईल

पुणे जिल्ह्यातील मतमोजणीची तयारी पूर्ण

पुणे जिल्ह्यातील पहिल्या फेरीतील मतमोजणी २३ मे रोजी सकाळी १० वाजता पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नावल किशोर राम यांनी दिली. प्रत्येकी फेरीतील मतमोजणीसाठी ३५-४० मिनिटे एवढा अवधी लागणार आहे. मतमोजणीच्या तयारीबाबतची माहिती देण्यासाठी सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यातील मतमोजणीसंदर्भातील माहिती सांगितली. 

EVM आणि VVPAT यातील मते जुळली नाही तर काय?, विरोधकांचा निवडणूक आयोगाला सवाल

नावल किशोर राम म्हणाले की, "पहिल्या फेरीतील मतमोजणी सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण होईल. प्रत्येक फेरीतील मतमोजणीसाठी जवळपास ३५ ते ४० मिनिटे लागतील. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना योग्य ते  प्रशिक्षण देण्यात आले असून आम्ही मतमोजणीसाठी तयार आहोत. निकाल जाहीर करताना इतर जिल्ह्यांसोबत कोणतीही स्पर्धा न करता अचूकतेवर भर देणार आहोत,"  

NDA ची मोठी बैठक, दिग्गज नेते सहभागी होणार

पुणे, मावळ, शिरुर आणि बारामती या चार मतदार संघाचा पुणे जिल्ह्यात समावेश आहे. मावळमध्ये २ हजार ५०४ मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची मत मोजणी ही २५ फेरीत, पुण्याच्या १ हजार ९९७ केंद्रावर झालेल्या मतदानाच्या मतमोजणी २१ फेरीत, शिरुरमधील २ हजार २९६ केंद्रावर झालेल्या मतदानासाठी २७ फेरीत तर बारामतीमधील २ हजार ३७१ केंद्रावर झालेल्या मतदानाच्या मतमोजणीसाठी २२ फेरीत मतमोजणी होणार आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Loksabha election 2019 Pune District counting first round over by 10 am each rount of counting of votes will take at least 35 to 40 minutes